मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पेटेश्वर देवाची यात्रा

पेटेश्वर देवाची यात्रा निमित्त महादेवाला करण्यात आलेली सजावट. 

घाटाई देवी भाग 1 ⚛️🕉️✡️

Ghatai Devi सातारा ते कास पठार भागातील सर्वात मोठी असणारी यात्रा म्हणजे घाटाई देवी यात्रा दर वर्षी पौष कृष्णपक्ष संकष्टी चतुर्थी ला देवीची भव्य दिव्य अशी यात्रा भरत असते. सातारा पासुन 29 किलोमीटर अंतरावर असलेल्या या देवीची किर्ती मात्र पूर्ण महाराष्ट्रभर अपल्याला पहिला मिळते. सातारा तलुक्यातील असंख्य लोक या देवीच्या दर्शनासाठी व नवसाची परत फेड करण्यसाठी येत असतात. हिला जंगलातील घाटाई  देवी म्हणुन देखिल ओळखले जाते. पारंपरिक पद्धतिने सुंदर अशा रितीने विधिवत तिची रोज पुजा अर्चा केली जाते. हि जंगलातील घाटाई देवी असल्यामुळे देवीचा फोटो किवां मुर्ति आपल्या कडे पुजली जात नाहि. तेथिल पुजारी यांनी सांगितले सुरुवातीला असंख्य लोकांनी श्रध्देने देवीचे फोटो आपल्या सोबत घेऊन आप आपल्या घरी किवा व्यवसायाचा ठिकणी लावले होते परंतू त्यांनी ते परत देवीच्या मंदिरात आणून ठेवले. त्यामुळे या देवीला तिच्या जागी जाऊनच तिचा मान पान दिला जातॊ. विशेष म्हनजे या देवीच्या यात्रेला बैलाच्या अंगात येते. आता पर्यंत माणसांचा अंगात येते हे सर्वांना माहित होते परंतु बैलाचा अंगात कस येते हे कितेक लोकांना माह...

आम्ही निसर्ग प्रेमी

नमस्कार मित्रांनो सातारा कास पठार पाँईंट आपल्या सगळ्यांना कशाची नाही कशाची आवड असतेच तसा प्रत्येकाच्या आवडी निवडी वेग वेगळ्या असतात पण निसर्ग सगळ्यांना आवडतो.   सद्याच्या धावपळीच्या युगात प्रत्त्येकाला मण मोकळे जगायला फिरायला आवडते. माणूस रोज रोज च्या कामला , व्यवसायाला कंटाळून गेला आहॆ. म्हणुन प्रत्त्येकाला कुठॆ तरी मोकळ्या  वातावरणात जावून मन हलके करावे वाटते. निसर्गात ऎक अशी जादु आहे एकदा का आपण घरातून बाहेर पडलो की परत घरी जाऊच नये अस वाटते. तन मण त्या वतावरणात मिसळुन जाते आणि प्रसन्न होते आणि सगळा तान तणाव निघून जातॊ. तसेच प्रत्येक ऋतु प्रमाणे निसर्ग हा आपले रंग रुप बदलत असतो. त्यामधे कासच्या विषयच वेगळा आहे. कासचे मोहक रुप बघायला लोक देशातुन परदेशातून येत असतात, जास्त करुण फुलाच्या मोसम मध्ये कास ला खुप लोक येत असतात. सातारा ते कास पठार पर्यंत असे भरपुर पाँईंट अहेत जे की स्थानिक लोकांना देखील अजून पर्यंत माहित नाहीत. त्यासाठी आपण हा ब्लाँग तयार केला आहे. यामध्ये आपली संस्कृति आणि तेथील लहान मोठी धार्मिक स्थळे यांच्या देखिल समावेश राहिल. 

sunrise in Satara Kas pathar 🌄❤️

हनुमान टेकडी

नमस्कार मित्रांनो सातारा कास पठार पाँईंट राजधानी सातारा सातारा मधून कास पठार ला जाताना अगदी सुरुवातीला लगाते ते म्हणजे हनुमान टेकडी घाटाला सुरूवात झाली लगेच समोर असणारा हा पाँईट यावर पोहोचण्यासाठी पाऊल वाट आहॆ 5-10 मिनटात सहज तिथे पोहचता येते,  तेथे गेल्यावर समोर भव्य असा अजिंक्यतारा चे दर्शन होते. उजव्या हाताला सज्जनगड आणि डाव्या हाताला अथांग पसरलेला सातारा दिसतो, सकाळी शहरातील लोक तिथे व्यायाम आणि योगासने करण्यासाठी जातात. सकाळी सुर्योदय होताना तिथून बघणे म्हणजे येक वेगळाच आनंद आणि तेथिल वातावरण स्वच्छ हवा असल्यामुळे थकवा काय असतो जाणवत देखिल नाही , आणि दिवस भर मन अगदी प्रसन्न रहाते. अनेक जण आपल्या दिवसाची सुरूवात हि राजधानी साताऱ्याचे दर्शन करुन करतात. एकदा अवश्य भेट द्या. www.satarakaspathar.com  ,

peteshwar

#world heritage #satara heritage ❤️ .In winter season look 👀