मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

satara kas pathar लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*खग्रास सूर्यग्रहण,*

*खग्रास सूर्यग्रहण* फाल्गुन कृष्ण अमावस्या सोमवार दिनांक 8 9 एप्रिल 2024 रोजी रेवती नक्षत्रावर मीन राशि हे खग्रास सूर्यग्रहण होत आहे हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने याचे वेद पाहण्याचे कारण नाही.

"कास च खास"

कासचा रानमेवा नेरडा (अंबोळक्या)

"कासचं खास"                   कास पठार भागातील डोंगर माथ्यावर अनेक प्रकारचे रानमेवा आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये सध्या अंबुळक्या नावाचा रानमेवा आपल्या खायला मिळतो. काही भागात हा नेरडा म्हणून प्रसिध्द आहे. आपल्या पठारावर अंबुळक्या म्हणून ओळखले जाते. हे फळ दिसायला लहान असेल तरी चव मात्र एक नंबर लागते. आंबट गोड चव लागते काही लोक ह्याची कडी देखील करतात. लहानपणी आम्ही कधी शाळा सुठते आणि आम्ही कधी रानात जातोय असं होयच. तस तर घरापासून ५ते6 किलो मीटर अंतरावर गेल्यावर अंबुळक्या ची जाळ्या भेटायच्या मंग आम्ही सगळे जण आपापल्या पिशव्या भरून काढायचो. कधी दिवस जायचा कलयचेच नाही .खर तर कास पठार हे फुला साठी प्रसिध्द आहे. तुम्ही भरपूर वेळा आला असाल परंतु "कासच खास " असणारे रानमेवा आपण कधी खलला आहे का? मग नक्की या आणि खाऊन बगा आणि इतर ना देखील सांगा.