मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

@satarakaspathar लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शिवपेठेश्वराचा गुहा 🙏🙏. हे ठिकाण साधारण साताऱ्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. ह्या डोंगरावर चढायला किमान कमीत कमी अर्धा तास लागतो. चढताना सुंदर सुंदर दृश्य नजरेस पडतात. काही अंतरावर चढ-उतार जमीनच आहे. आणि काही अंतर चढून गेल्यावर पायऱ्या दिसतील. सगळ्यात वर म्हणजेच गुहेत पोहोचल्यानंतर शांत थंड असं वातावरण लगेच जाणवते. तिथे एक शिवपेटेश्वराची पिंड आणि एक नंदी असे स्वरूप आहे. गुहेच्या आत मध्ये एक पाण्याचं थंड पाण्याचं तळ आहे . तिथे साक्षात महादेव ध्यानस्थ होण्यासाठी येतात.अशी आख्यायिका गावातल्या ग्रामस्थांकडून ऐकायला मिळते. डोंगरावरून उजव्या साईडला सुंदर असं उरमोडी धरण ,सज्जनगड, व इतर काही गाव पाहायला मिळते. तर डाव्या बाजूला सुंदर असा मेरुळ पर्वत जो की अगदी गुत्त्याच्या स्वरूपाचा आहे तो पाहायला मिळतो. सर्वत्र आजूबाजूला दात धोक्यांची चादर पाहायला मिळते त्यातच पावसाच्या सरींचा े सुंदर आनंद लुटता येतो.गुप्त्याच्या वरती एक सुंदर पठार पाहायला मिळते ह्या पठारावर जाण्याचा मार्ग जरा कठीण असला तरी काही हौशी पर्यटक तेथे जाण्याचे धाडस करतात.पावसाळ्यात सगळ्यात पर्यटकांचे आकर्षण ठरणारा हा पेटेश्वराचा डोंगर ठरतो. मग ते फक्त ट्रेकिंग किंवा आनंद लुटण्यासाठी नव्हे तर शिवपेटेश्वराचे साक्षात दर्शन व्हावे म्हणून देखील काही पर्यटक उत्सुक असतात. त्यामुळे आयुष्यात एकदा ना एकदा तरी हा शिवा पेटेश्वराचा गुत्ता पाहिलाच पाहिजे.💫🙏